वाहनामध्ये अनधिकृतपणे गॅस भरणार्‍याविरूध्द गुन्हा

व्हॅनमध्ये गॅस भरताना झाला होता स्फोट || व्हॅन मालकाची फिर्याद
वाहनामध्ये अनधिकृतपणे गॅस भरणार्‍याविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाहनामध्ये गॅस भरण्याचा कोणताही परवाना नसताना अनधिकृतपणे वाहनात गॅस भरताना स्पार्किंग होऊन वाहनाला आग लागून संपूर्ण वाहनाचे नुकसान झाल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन मालक संजय पांडुरंग खोटे (वय 37 रा. कोंबडीवाला मळा, सोलापूर रोड, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

आयाज इलियास शेख (रा. झेंडीगेट, अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली टॉकीज जवळील पाण्याच्या टाकी खाली अनधिकृतपणे चाललेल्या गॅस रिफिलिंग सेंटरमध्ये 28 एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता. औरंगाबाद रोडवरून जात असताना खोटे यांच्या मारूती व्हॅनमधील (एमएच 16 एजे 0583) इंधन संपल्याने त्यांनी शेजारी विचारपूस केल्यानंतर पाण्याच्या टाकीजवळ गॅस भरून मिळत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी आयाज इलियास शेख याच्याकडे विचारपूस केली असता मी एलपीजी गॅस वाहनामध्ये भरून देतो असे सांगितले.

मात्र, त्याने अत्यंत निष्काळजीपणाने त्याच्याकडील गॅस वाहनात भरत असताना स्पार्किंग होऊन आग लागली व त्यामध्ये व्हॅनचे संपूर्ण नुकसान झाले. चौकशी केली असता आयाज शेख याच्याकडे वाहनामध्ये गॅस भरण्याचा कोणताही परवाना नसून तो अनाधिकृतपणे वाहनामध्ये गॅस भरून देत असल्याचे समजले. त्याच्या निष्काळजीपणामुळेच व्हॅनला आग लागून नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पालवे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com