उंबरी बाळापूर शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

उंबरी बाळापूर शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील उंबरी बाळापूर (Umbari Balapur) शिवारातील सुंदरबापू बाळासाहेब शिंदे यांच्या घराजवळील विहिरीमध्ये (Well) बुधवारी मध्यरात्री बिबट्या (Leopard) पडला. गुरुवारी सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने ( Forest Department) या बिबट्याला (Leopard) विहिरीतून (Well) सुखरुप बाहेर काढत जीवदान दिले आहे.

बुधवारी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास शिकारीच्या शोधात बाहेर पडलेला बिबट्या (Leopard) हा अंदाज न आल्याने येथील शेतकरी सुंदरबापू बाळासाहेब शिंदे यांच्या गट नं. 216 मध्ये असलेल्या विहिरीमध्ये पडला होता. सकाळी शिंदे कुटुंबिय उठले असता विहिरीलगत कुत्रे मोठ्याने भुकंत सैरावैर पळत असल्याचे दिसल्याने सुंदरबापू शिंदे यांनी विहिरीत डोकाऊन पाहिले असता त्यांना एक बिबट्या (Leopard) विहिरीत (well) पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भुसाळ यांना फोन करून विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती दिली. अशोक भुसाळ यांनी तात्काळ वनविभागाचे कर्मचारी अशोक गिते यांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील यांचे मार्गदर्शानाखाली वनक्षेत्रपाल एस. एस. माळी, वनपाल पी. जे. पुंड, वनरक्षक एस. एम. पारधी, पडवळे, वाहन चालक बोर्‍हाडे, अशोक गीते, डेंगळे आदी कर्मचार्‍यानी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी वनविभाग बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करत असताना गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भुसाळ, भगवान मैड, अतुल भुसाळ, शिवम शिंदे, संपत भुसाळ, सुनील शिखरे, अनिल सारबंदे, सतीश भुसाळ, राजेंद्र निर्मळ, गोवर्धन उंबरकर, गोकुळ खेमनर, सत्यम भुसाळ, शुभम भुसाळ, विशाल भुसाळ आदींसह परिसरातील नागरिकांनी वनविभागाला मदत केली.

दरम्यान या बिबट्याला (Leopard) ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने (Forest Department) विहिरीतून सुखरुप बाहेर काढले असून हा अडीच ते तीन वर्षाचा मादी बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने देऊन त्याला पुढील कार्यवाहीसाठी निंबाळे रोपवाटिकेत हालवले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com