उंबरीबाळापूर शिवारात बिबट्या जेरबंद

बिबट्या (File Photo)
बिबट्या (File Photo)

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील उंबरीबाळापूर परिसरात शेतकर्‍याच्या पशुधनावर हल्ले करणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बिबट्या (File Photo)
नगर-मनमाड रस्त्यांचे काम होणार 'या' महिन्यात सुरू

उंबरी बाळापूर परिसरात मागील अनेक दिवसापासून बिबट्याची दहशत आहे. काही दिवसापूर्वी गावातील शेतकरी मच्छिंद्र खेमनर यांच्या गोठ्यातील कालवडीला बिबट्याने हल्ला करत ठार केले होते. त्यानंतर सातत्याने बिबट्याचा वावर या परिसरात असल्याने नागरीकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरातील नागरीकांनी उपसरपंच नानासाहेब उंबरकर यांच्याशी संपर्क करुन या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. उपसरपंच नानासाहेब उंबरकर यांनी तात्काळ वनविभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क करुन घटनेचे गांभीर्य त्याच्या लक्षात आणून देत याठिकाणी पिजंरा लावण्यासाठी पाठपुरावा केला.

बिबट्या (File Photo)
...तर सिताराम गायकर यांना पुन्हा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची लॉटरी

त्यामुळे उंबरी बाळापूर येथे वनविभागाचे वनरक्षक अशोक गिते व नागरीकांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिजंरा लावण्यात आला होता. या पिजंर्‍यात बिबट्याला भक्ष्य म्हणून स्थानिकानी 4 ते 5 बॉयलर कोबंड्या ठेवल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कोबंड्याच्या लोभापायी बिबट्यात पिजंर्‍यात घुसला व अडकला. त्यामुळे बिबट्याने जोरजोरात ओरडत पिंजर्‍याला धडका देण्यास सुरवात केल्यामुळे बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याचे स्थानिक नागरीकांच्या लक्षात आले व त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली.

बिबट्या (File Photo)
राष्ट्रवादी काँग्रेसची स्वबळाची तयारी

दरम्यान मध्यरात्री वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल प्रशांत पुंड, वनरक्षक साळू सोनवणे, अशोक गिते, रवी पडवळ व जारवाल यानीं घटनास्थळी दाखल होत रात्री 1 वाजेच्या सुमारास बिबट्याला पिजंर्‍यासहित ताब्यात घेतले आहे. यासाठी उपसरपंच नानासाहेब उंबरकर, धोंडीबापू खेमनर, आबा माळवदे, बाबासाहेब खेमनर, रामराम भुसाळ, नवनाथ भुसाळ, दत्ता काळे, सुनील डांगे, सखाराम भुसाळ, तुषार खेमनर, शिवाजी वावरे, दत्ता माळवदे, साहेबराव थोरात, रघु बर्डे, बारकू बर्डे, सचिन अंजनकर, गोरख माळवदे, शंकर शिखरे आदिसह परिसरातील नागरीकांनी मोठे सहकार्य केले असून 2 वर्ष वयाचा नर बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

बिबट्या (File Photo)
संगमनेरच्या प्रवरा नदीपात्रात आढळले दोन मृतदेह

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com