उंबरी बाळापूर सेवा सोसायटीवर जनसेवा मंडळाची सत्ता

उंबरी बाळापूर सेवा सोसायटीवर जनसेवा मंडळाची सत्ता

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील अतिशय प्रतिष्ठेची सेवा सहकारी संस्था म्हणून लौकिक असलेल्या उंबरी बाळापूर सेवा सहकारी संस्थेवर माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाने निर्विवाद वर्चस्व राखत 13 जागा बिनविरोध करत सत्ता राखली आहे.

नुकतीच सेवा सोसायटीच्या 13 जागासाठी 2022-27 साठी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे 54 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 4 मे रोजी माघारीच्या दिवशी अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे केवळ 13 अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले.

यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून बाळकृष्ण बाबुराव भुसाळ, पांडुरंग धोंडीबा भुसाळ, सुरेश धोंडीबा ब्राम्हणे, नितीन भागवत उंबरकर, ताराचंद दशरथ भुसाळ, बापूसाहेब शंकरराव भुसाळ, नामदेव महादू भुसाळ, अशोक श्रीरंग निर्मळ हे उमेदवार बिनविरोध झाले. इतर मागास प्रवर्गातून सुखदेव प्रभाकर डोखे, महिला प्रवर्गातून मंदाबाई मारुती सारबंदे, मंगल आबाजी उंबरकर, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून शिवाजी दारकू शिखरे व भटक्या विमुक्त जाती, जमाती विशेष मागास प्रवर्गातून सुभाष गेणू जुंधारे असे 13 उमेदवार या निवडणूक प्रक्रीयेत बिनविरोध झाल्याने जनसेवा मंडळाने एकहाती बाजी मारली आहे. नूतन पदाधिकार्‍यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Stories

No stories found.