उंबरेत दूधवाल्याकडून विवाहितेचा विनयभंग

उंबरेत दूधवाल्याकडून विवाहितेचा विनयभंग

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

घरोघर जाऊन दूध घालणार्‍या तरूणाने दूध देत असताना एका 27 वर्षीय विवाहित तरूणीचा हात धरुन तू मला खूप आवडतेस असे म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. ही घटना दि. 3 जून रोजी राहुरी तालुक्यातील उंबरे शिवारात घडली.

त्या 27 वर्षीय विवाहित तरूणीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 3 जून रोजी यातील आरोपी किरण उर्फ रवींद्र अरूण ढोकणे, रा. उंबरे, ता. राहुरी हा महिलेच्या घरी दूध घालण्यासाठी गेला. ती विवाहित महिला तिच्या घरासमोर आरोपी ढोकणे याच्याकडून दूध घेत असताना त्याने तिचा हात धरला. तू मला खूप आवडतेस, असे म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

त्यावेळी तिने हा प्रकार सासू-सासर्‍यांना सांगितला. त्यांनी त्यांच्या दुसर्‍या मुलाला फोनवरुन झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्या विवाहित तरूणीचे सासू-सासरे व दीर यांनी आरोपीच्या घरी जाऊन त्यास विचारले, तू माझ्या वहिनीचा हात का धरला? असे म्हणाला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करुन, तुमची लायकी आहे का? माझ्या घरी यायची? असे म्हणून त्याने तरूणीच्या दिराला दगडाने मारहाण करून जखमी केले.

या घटनेनंतर त्या विवाहित तरूणीने राहुरी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी किरण उर्फ रवींद्र अरूण ढोकणे याच्या विरोधात विनयभंगाचा तसेच मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दिनकर चव्हाण हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com