उंबरेत घराची भिंत पडून शाळकरी विद्यार्थीनीचा मृत्यू

उंबरेत घराची भिंत पडून शाळकरी विद्यार्थीनीचा मृत्यू

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील उंबरे गावातील वैष्णवी सुनील ढोकणे (वय 11) या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी शिक्षण घेणार्‍या चिमुकलीचा काल शनिवारी पहाटे 4.30 दरम्यान पावसामुळे घराची भिंत कोसळून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे ढोकणे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या घटनेमुळे ढोकणे कुटुंबाने घटनास्थळी अक्षरशः हंबरडा फोडला.

पहाटेच्या दरम्यान वीज कडाडली. त्यामुळे ढोकणे कुटुंबातील व्यक्तींना जाग आली. दरम्यान घराला हादरा बसला. समयसूचकता लक्षात घेता तात्काळ कुटुंबातील अन्य सदस्यांनी घराबाहेर पळ काढला. सुदैवाने कुटुंबातील अन्य व्यक्तींचा जीव वाचला. मात्र, दुर्दैवाने वैष्णवी ही त्या भिंतीखाली सापडली.

वैष्णवीची आजी जखमी झाली. या घटनेचा धसका घेतल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर सध्या पुढील उपचार सुरू आहेत. ढोकणे परिवार अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात वैष्णवी हिच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

No stories found.