उंबरे येथील दोघांना लोखंडी पाईपने मारहाण

गुन्हा दाखल
उंबरे येथील दोघांना लोखंडी पाईपने मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील उंबरे येथील दत्तात्रय काळे व नारायण ढोकणे यांना दोघांनी लाथा बुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना दिनांक 13 नोव्हेंबर रोजी घडली आहे.

दत्तात्रय ज्ञानदेव काळे, यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय काळे यांच्यासह संतोष ज्ञानदेव शिकारे, नारायण वसंत ढोकणे हे ब्राम्हणी गावचे शिवारातील हॉटेल समोर उभे असताना तेथे राहुल दादासाहेब वैरागर व अमोल दादासाहेब वैरागर दोघे राहणार उंबरे, ता. राहुरी हे तेथे आले व काहीएक कारण नसताना त्यांना शिवीगाळ करू लागले. तेव्हा दत्तात्रय काळे त्यांना म्हणाले, आम्हाला शिवीगाळ का करता.

आम्ही तुम्हाला काहीच बोललो नाही. असे म्हणाले असता त्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी लाथा बुक्क्याने मारहाण करण्यास सुरवात केली. राहुल वैरागर याने तेथे पडलेला लोखंडी पाईप उचलुन दत्तात्रय काळे व नारायण ढाकणे यांना मारहाण केली. तसेच पुन्हा आमचे नादी लागला तर जीवेच मारु, अशी धमकी दिली. दत्तात्रय काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राहुल दादासाहेब वैरागर व अमोल दादासाहेब वैरागर, दोघे राहणार उंबरे, ता. राहुरी. यांच्यावर गुन्हा रजि. नं. 1151/2022 भादंवि कलम 323, 324, 504, 506, 34 प्रमाणे मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साईनाथ टेमकर हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com