उक्कलगाव सोसायटीच्या स्विकृत संचालकांसह तक्रार निवारण समितीच्या निवडी जाहीर

उक्कलगाव सोसायटीच्या स्विकृत संचालकांसह तक्रार निवारण समितीच्या निवडी जाहीर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या उक्कलगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या स्विकृत संचालक व तक्रार निवारण समितीच्या निवडी संचालक मंडळ व समाजसेवा मंडळाच्या बैठकित सर्वानुमते करण्यात आल्या.

संस्थेचे सूत्रधार व ज्येष्ठ संचालक इंद्रनाथ पा.थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित या निवडी करण्यात आल्या.स्विकृत तज्ञ संचालकपदी शिवाजी सुकदेव थोरात, अरुण रोहिदास गोळे व संजय बाबुराव जगधने यांच्या तर तक्रार निवारण समितीच्या जम्बो कार्यकारिणीत विकास शामराव थोरात, रमेश मच्छिंद्र थोरात, बाबासाहेब कुंडलिक थोरात, अशोक जगन्नाथ थोरात, गोरक बाबुराव थोरात, भास्कर गोविंद मुठे, संदीप बबन थोरात, विलास नानासाहेब शिंदे, पंडित लक्ष्मण मोरे व सतीश तुळशिराम फुलपगार यांच्या निवडी करण्यात येऊन तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी विकास शामराव थोरात यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी विकास थोरात, शिवाजी थोरात, अरुण गोळे यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेने टाकलेल्या विश्वासास कदापीही तडा जाऊ न देता सभासदाभिमुख कारभार करण्याची ग्वाही दिली.

यावेळी बन्सीभाऊ थोरात, आबासाहेब सो. थोरात, मधुकर शिंदे, प्रकाश जगधने, किशोर जगदेव थोरात, संभाजी सुकदेव थोरात, बाबासाहेब भिकाजी थोरात, बाबासाहेब रामा थोरात, बंडेराव तांबे यांनी निवड समितीचे कामकाज सांभाळले.

याप्रसंगी संस्थेचे सर्व सभासद, चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ तसेच समाजसेवा मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थउपस्थित होते.

देवस्थान न्यायालयीन प्रक्रियेवरही चर्चा

हरिहर केशव गोविद महाराज देवस्थानच्या न्यायप्रविष्ठ प्रक्रियेबाबत यावेळी सविस्तर चर्चा होऊन त्यात सर्वानुमते विश्वस्त मंडळ निवडीबाबत सुरू असलेला लढा कायदेशीर पध्दतीने लढून न्यायालय देईल तो निर्णय मान्य करण्याचे ठरले. न्यायदेवतेवर आपला विश्वास असल्याचे यावेळी विश्वस्त इंद्रनाथ पा.थोरात म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com