
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील उक्कलगाव येथे हरिहर केशव गोविंद महाराज यात्रेनिमित्त आयोजित तमाशा कार्यक्रमात धुडगूस घालत कार्यक्रम बंद केला. पोलिसांना शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात उक्कलगावच्या सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उक्कलगाव येथे हरिहर केशव गोविंद महाराज यात्रेनिमित्त 4 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी सविता राणी पुणेकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी पो.नाईक रामेश्वर दत्तात्रय ढोकणे, पोलीस कॉन्स्टेबल निखील अशोक तमनर, पोलीस कॉन्स्टेबल हरिश अशोक पानसंबळ तसेच होमगार्ड सद्दाम पुरा शेख, रमेश राजाबापू गुंजाळ, होमनाईक शाहरुख नुम, शिपाई निलेश, सचिन दत्तात्रय नागडे,कमलेश गंगाधर गायकवाड असे आम्ही उक्कलगाव गावात बंदोबस्त ठिकाणी हजर होतो,
कार्यक्रमास गावातील लोक जमा झालेले होते. कार्यक्रम रात्री 9 वा. सुरू झाला तो रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास बंद केला. त्यावेळी उक्कलगावचे सरपंच नितीन आबासाहेब थोरात हे कार्यक्रमाचे स्टेजवर उभे राहून हातात माईक घेऊन कार्यक्रम कोणी बंद पाडला आम्हाला माहित आहे असे म्हणून शिवीगाळ केली. तेव्हा पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे असे स्टेजवर जावून त्यास समजावून सांगत त्यांना स्टेजचे खाली आणले.
कार्यक्रम पोलिसांनी का बंद केला? त्यांना कोणी सांगितले? गाव आपले आहे, असे म्हणून ते चिथावणी देत होते. तेव्हाही त्यांना समजावून सांगत जमलेल्या लोकांना घरी जाण्यास सांगुन गर्दा कमी केली होती. सरपंच नितीन थोरात यांना समजावुन सांगत तेथुन काढून दिले. त्यानंतर काल मंगळवार दि. 05 एप्रिल 2022 रोजी मध्यरात्री सरपंच नितीन धोरात हे लोकांना घेवून थांबलेला असताना मोठमोठ्याने पोलीस प्रशासनाविषयी वाईट भावनेने बोलत होते. म्हणून आम्ही तेथे येवून त्यास समजावुन सांगुन घरी जाण्यास सांगत होतो; परंतु त्याने आमचे काहीएक ऐकत नव्हता. तो मोठमोठ्याने पोलीस कुत्रे आहेत, यांचा बेत पाहा रे... आता यांच्याकडे पाहावंच लागेल, असे म्हणून पोलिसांना शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला .
याप्रकरणी पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नितीन आबासाहेब थोरात यांचेविरुद्ध भादंवि कलम 353. 232, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.