प्रवरानदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यु

खुपटी गावावर शोककळा
प्रवरानदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यु

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील खुपटी (Khupati) येथे दोन दिवसांपुर्वी प्रवरानदी पात्रात (Pravara River) पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा मृत्युदेह शनिवार दि.16 रोजी प्रवरानदीच्या पाण्यात (Pravara River Water) तरंगतांना आढळून आल्याने या घटनेमुळे खुपटी (Khupati) गावांत प्रचंड शौककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोहण्यासाठी (Swim) गेलेल्या युवकांचा पाण्याच्या गाळात बुडून दुर्देवी मृत्यु (Unfortunate Death by Drowning) झाल्याची चर्चा आहे.

या घटनेबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) खुपटी (Khupati) येथील महादेव मंदिर परिसरातील प्रवरा नदीपात्राच्या पाण्यात (Pravara River Water) खुपटी (Khupati) गावातील दिपक प्रकाश घोरपडे (वय 30 वर्षे) व प्रविण पावलस ठुबे (वय 30 वर्षे) हे दोघे मित्र पोहण्यासाठी बुधवार दि.14 रोजी नदीत (River) गेलेले होते. मात्र पुन्हा ते घरीच आलेले नसल्यामुळे हे दोन युवक कामाला गेले असतील अशी शंका घरच्यांना आलेली होती.

परंतु ते घरी न येता शनिवार दि.16 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गावांत दोन तरुणांचा मृत्युदेह पाण्यात तरंगतांना आढळून आल्याची चर्चा गावात पसरल्यामुळे पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या युवकांचा नदीपाञातील गाळात बुडून मृ्त्यु (Death by Drowning in River Silt) झाल्याची प्राथमिक माहीती हाती आलेली आहे.

या घटनेबाबत अमोल पावलस ठुबे यांनी दिलेल्या खबरीवरुन नेवासा पोलिस ठाण्यात (Newasa Police Station) आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रेवनाथ मरकड करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com