धरणात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

धरणात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

या तालुक्यातील घटना

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

धरणात बुडून दोन तरुण मुलांचा मृत्यू (Two Young Boys Died after drowning in the Dam) झाल्याची घटना वैजापूर (Vaijapur) तालुक्यातील डवाळा (Dawala) येथे रविवार (दि.25) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. शाहीद इरफान सय्यद (वय 18 रा. डवाळा) व आयुष संतोष पडवळ (वय 13 रा. डवाळा) असे या घटनेतील मयत तरुणांचे नाव आहे.

याबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयुष हा समृध्दी महामार्गालगत (Samruddhi Highway) असलेल्या डवाळा धरणालगत (Dawala Dam) बकर्‍या चरवत असताना त्याची एक बकरी (Goat) पाण्यात पडली. तिला काढण्यासाठी तो गेला असता त्याचा पाय घरून तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. ही बाब शाहीद ने बघितल्यावर त्याला वाचवण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तोही पाण्यात बुडायला लागला.

धरणात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू
श्रीरामपुरात पहाटे फिरते ‘विकृत’ टोळी

परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी शाहीद ला बाहेर काढले व तातडीने त्याला वैजापूर (Vaijapur) येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी (Doctor) त्याला तपासून मृत घोषित केले. मात्र आयुष हा पाण्यात खोलवर बुडल्याने त्याला नागरिकांना वर काढता आले नाही. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे (Vaijapur Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक राम घाडके, पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख, हेड कॉन्स्टेबल सिंगल यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने आयुष याचा मृतदेह (Dead Body) बाहेर काढला. या प्रकरणी वैजापूर पोलिसांत (Vaijapur Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहे. मात्र एकाच दिवशी गावातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याने गावात शोककळा पसरल्या आहे.

धरणात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू
अखेर राज्यात मान्सूनची सलामी
धरणात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू
शांताबाई कोपरगावकरांची राज्य महिला आयोगाकडून दखल

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com