दुचाकी चोरणार्‍या दोघांना 12 तासात अटक

तोफखाना पोलिसांची कामगिरी || दुचाकी हस्तगत
दुचाकी चोरणार्‍या दोघांना 12 तासात अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडीतील खासगी हॉस्पिटलसमोरून दुचाकी चोरून नेणार्‍या दोघांना तोफखाना पोलिसांनी 12 तासात अटक केली. अजय जयवंत खंदारे (वय 21 मुळ रा. आंबेडकरनगर, सिडको, औरंगाबाद, हल्ली रा. बोल्हेगाव) व ऋषिकेश भाऊराव शेळके (वय 23 रा. आंबेडकरनगर, सिडको, औरंगाबाद) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महारूद्र अरूण चिकणे (वय 31 रा. कॉटेज कॉर्नर, अहमदनगर) हे त्यांची दुचाकी (एमएच 16 बीपी 1243) घेऊन सावेडीतील अ‍ॅपेक्स हॉस्पिटल येथे गेले होते. तेथून चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली होती. चिकणे यांनी याबाबत तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली होती.

तोफखाना पोलिसांनी सदर दुचाकी चोरट्यांची गोपनीय माहिती काढली असता ते दुचाकी घेऊन औरंगाबादला गेले असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार अविनाश वाकचौरे, धीरज खंडागळे, सचिन जगताप, गौतम सातपुते यांच्या पथकाने आरोपींना औरंगाबाद येथून ताब्यात घेत अटक केली. अधिक तपास पोलीस अंमलदार धीरज अभंग करीत आहेत.

Related Stories

No stories found.