श्रीगोंद्यात चार दुचाकी पेटवल्या

श्रीगोंद्यात चार दुचाकी पेटवल्या

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा शहरातील (Shrigonda City) सावरकर चौक आणि पंचायत समितीच्या परिसरातील नागरी वस्ती मध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी चार दुचाकी गाड्या पेटवून (Bike Fire) दिल्याने शहरात सकाळी एकच खळबळ उडाली.

आता या दुचाकी गाड्या पेटवण्यासाठी कृत्य नेमके कोणत्या कारणीतुन केले अथवा कोणी विक्षिप्त व्यक्तीने हे केले याबाबत उलट सुलट चर्चा सरु आहे. या दुचाकींमध्ये एका पोलीस कर्मचार्‍यांच्या दुचाकीचा देखील समावेश आहे.आता नेमके रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. नेमके कोणी हे कृत्य केले याचा तपास पोलीसांनी केला तर पुढील अनर्थ टळणार आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com