अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील पुणतांबा रोडवर (Puntamba Road) असणाऱ्या डावखर मंगल कार्यालयाच्या (Dawkhar Mangal Karyalay) समोर, वॉर्ड नंबर 1, श्रीरामपूर याठिकाणी मोटारसायकलचे चालक विश्वनाथ गोपीनाथ मापारी(वय 61) हे मयत झाल्याची घटना घडली आहे.

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
Video : राहुरी खुर्दमध्ये सरपंचपदाच्या निवडीवेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले; काही काळ तणाव, पाहा व्हिडिओ

अधिक माहिती अशी की, मोटरसायकलस्वार मापारी हे डावखर मंगल कार्यालया समोरून भरधाव वेगाने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल चालवत होते . मोटर सायकलचा वेग जास्त असल्या कारणाने त्याचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले आणि तोल जाऊन ते जोरात रोडवर पडले. या अपघातात गंभीर दुखापत होऊन विश्वनाथ मापारी यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद. 46/ 2021 अन्वये घेण्यात आली होती. त्याच्या तपासा वरून पुढे काल रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 443/2021 भादवि कलम 304 अ वगैरेचा हयगयीने मृत्युस जबाबदार असा गुन्हा विश्वनाथ गोपीनाथ मापारी यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हापसे हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com