पेरणी सुरू असताना ट्रॅक्टरखाली चिरडून दोन ठार

पेरणी सुरू असताना ट्रॅक्टरखाली चिरडून दोन ठार

पारनेर | प्रतिनिधी

ट्रॅक्टरच्या (Tractor) मदतीने शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात (Accident) पेरणी यंत्रावर (Sowing machine) बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू (Accidental death) झाला.

वाडेगव्हाणमधील (Vadegavhan) अलभरवाडी शिवारात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक जालींदर नानाभाऊ गुलदगड (वय ३८ रा. यादववाडी, तरडे मळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

सुपे पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार दि.२४ रोजी दुपारी जालिंदर दुलदगड हा वाडेगव्हाण शिवारातील शेतामध्ये छोटया ट्रॅक्टरने पेरणी करीत होता. पेरणी यंत्रावर तुकाराम भिमाजी तरडे (वय ४८) व शुभम दत्तात्रय तरडे (वय १३) हे बसलेले होते. पेरणी सुरू असताना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चालक जालिंदर याने अविचाराने ट्रॅक्टर चालवून तो बांधावर घातला. बांधावर गेलेला ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली तुकाराम भिमाजी तरडे व शुभम दत्तात्रय तरडे हे चिरडले गेले. त्यातच त्यांचा दुर्देवी अंत झाला.

दोघांच्याही डोक्यास तसेच पोटास जबर मार लागल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. दुर्घटनेनंतर परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुपे पोलिसांना त्याबाबतची माहीती देण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येउन अपघातग्रस्त ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला. राजेंद्र बाळासाहेब शेळके (रा. वाडेगव्हाण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुकाराम तरडे व शुभम तरडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबददल जालींदर नानाभाऊ गुलदगड (वय ३८ रा. यादववाडी, तरडे मळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली. पुढील तपास डॉ. नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपे पोलिस करीत आहेत.

Related Stories

No stories found.