बेलापुरात दोन शिक्षक करोनाबाधित

शैक्षणिक संकुल बंद ठेवण्याचा निर्णय; तालुक्यात 13 रुग्ण बाधित
बेलापुरात दोन शिक्षक करोनाबाधित

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी सातपर्यंत 13 रुग्ण करोना बाधीत आढळले आहेत. त्यात तालुक्यातील बेलापूर

येथील एका शैक्षणिक संकुलातील दोन शिक्षक करोना बाधीत झाल्याने पुढील सात दिवस हे संकुल बंद ठेवण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.

श्रीरामपूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी सात पर्यंत कोरोना चाचणीत 13 रुग्ण करोना बाधीत आढळले आहेत. तर तालुक्यातील शैक्षणिक संकुलात आता करोनाने शिरकाव करायला सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात मालुंजा येथील विद्यालयात करोना बाधीत विद्यार्थीनी सापडली होती. त्यावर स्थानिक शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांनी सात दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानंतर शुक्रवारी बेलापुरातील दोन शिक्षक बाधीत निघाले आहेत. या संकुलात बेलापूरसह विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. अजून कोणाला बाधा होऊ नये म्हणून व करोनाची साखळी तुटावी यासाठी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सात दिवस (शुक्रवारपर्यंत) दिवस संपूर्ण शैक्षणिक संकुल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या विद्यालयात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली असून ग्रामपंचायत प्रशासन याबाबत सतर्कता बाळगुन आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com