बालिकाश्रम रोडवर दरोडा टाकणारे दोघे जेरबंद

तोफखाना पोलिसांची कारवाई
बालिकाश्रम रोडवर दरोडा टाकणारे दोघे जेरबंद
जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सराईत गुन्हेगार विजय राजू पठारे याच्यासह त्याच्या टोळीतील सहा जणांनी बालिकाश्रम रोडवरील कापड दुकान

तसेच निलक्रांती चौकातील सायकल मार्टच्या दुकानात मागील महिन्यात धुमाकूळ घालत दरोडा टाकला होता. या गुन्ह्यातील अजय पठारे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केल्यानंतर तोफखाना पोलिसांनी याच गुन्ह्यातील इतर दोघांना बुधवारी अटक केली आहे. आतापर्यंत तिघांना अटक झाली असून अजून मुख्य सूत्रधार विजय पठारे याच्यासह तिघे पसार आहेत.

प्रशांत ऊर्फ मयूर राजू चावरे (वय 24), बंडू ऊर्फ सुरज साहेबराव साठे (वय 22 दोघे रा. सिध्दार्थनगर, नगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अक्षय राजेंद्र जाधव (रा. बालिकाश्रम रोड, नगर) यांच्या कापड दुकानात विजय पठारे याच्या टोळीने दरोडा टाकला होता. तेव्हापासून पठारे टोळी पसार झाली होती. यातील अजय पठारे याला अटक केल्यानंतर तोफखाना पोलिसांनी बालिकाश्रम रोडवर प्रशांत चावरे, बंडू साठे यांना सापळा लावून जेरबंद केले.

शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी बी. व्ही. काळे, डी. बी. जपे, व्हि. आर. पठाण, जावेद शेख, शैलेश गोमसाळे, संतोष राठोड, अनिकेत आंधळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com