पिकअप-मोटारसायकलची जोरदार धडक; दोन जण ठार

अपघात | Accident
अपघात | Accident

संगमनेर | प्रतिनिधी |Sangamner

पिकअप व मोटारसायकल (Pickup and Motorcycles) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात (accident) मोटारसायकलवरील दोघे जण जागीच ठार (Killed) झाल्याची घटना संगमनेर-अकोले रस्त्यावरील (Sangamner-Akole road) डेरेवाडी फाटा (Derewadi Fata) येथे घडली. याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप खंडू माने (Sandeep Khandu Mane) (वय ३८) व भरत बाबुराव कराळे (Bharat Baburao Karale) (वय ५६) (रा.तांभोळ, ता. अकोले) असे मयतांची नावे आहेत. संदीप माने व भरत कराळे हे दोघे जण मोटारसायकलवर संगमनेरकडून डेरेवाडी फाट्याकडे चालले होते.

याचवेळी अकोल्याहून संगमनेरकडे भरधाव वेगाने येणार्‍या पिकअप जीप क्रमांक एम.एच.१५ एफ व्ही. ९४३४ हिने मोटारसायकलला समोरुन जोराची धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील संदीप खंडू माने व भरत बाबुराव कराळे हे जागीच ठार झाले. याप्रकरणी देवराम बाबुराव माने (रा.तांभोळ, ता.अकोले) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी (Police) चालक कैलास नामदेव सदगिर (रा.मुथाळणे, ता. अकोले) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०४,२७९,३३७, ३३८,४२७, व मोटारवाहन कायदा कलम १७७ व १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार व्ही.जी.खाडे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com