ढोकेश्वर विद्यालयाच्या दोन विद्यार्थांचा अटकेपार झेंडा !

ढोकेश्वर विद्यालयाच्या दोन विद्यार्थांचा अटकेपार झेंडा !

पारनेर(प्रतिनिधी)

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना संलग्न युथ गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित युथ गेम्स ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप 2021 स्पर्धेत टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर विद्यालय च्या दोन खेळाडूंनी सुवर्ण पदकांना गवसणी घातली आहे. विद्यालयाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

नवनाथ बाचकर व धनेश माने अशी सुवर्णपदक पटकवणार्‍या खेळाडूंची नावे आहेत. या स्पर्धेत नवनाथ तानाजी बाचकर याने 17 वर्षे वयोगटात 800 मी धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले तर धनेश पावसा माने याने 20वर्ष वयोगटात 1500 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदक पटकावले.

विद्यालयाच्या वतीने संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी पाटील यांच्या हस्ते या यशस्वी विद्यार्थ्यांचा फेटा बांधून आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयातील दर्शन पवन कुटे ह्या विद्यार्थ्याची एन. एम. एम. एस. स्कॉलरशिप साठी निवड झाली त्याचाही मा.सिताराम खिलारी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. धनंजय लाटे, प्रा. अशोक गांगड, कला विभागाचे समन्वयक प्रा.विजय सोबले, बाळासाहेब निवडुंगे, निलेश जासूद, मल्हारी वाघसकर, अमोल ठाणगे, प्रा.बाळासाहेब रोकडे, सुनिल जाधव, धोंडिभाऊ झावरे इत्यादी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्राचार्य सुरेश जावळे, पर्यवेक्षक दत्तात्रय हराळ, संजय मोरे, प्रा.गोवर्धन मते, प्रा. अण्णासाहेब गंगावणे, प्रा.आतिष झावरे, राहुल झावरे, श्रीकांत कातोरे, नारायण शेळके,अतुल सैद, बाबासाहेब जाधव. पवन कुटे निलम खिलारी, श्रीम. सुमन वाळुंज, शोभा गायकवाड, वैशाली गायके प्रिया डव्हणे अनिता म्हस्के मंजुषा शिंदे सुरेखा ठाणगे. इत्यादी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com