
पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
नेवासा (Newasa) तालुक्यातील पाचेगाव (Pachegav) येथील एका व्यक्तीने खरेदी केेलेल्या मोटारसायकलच्या (Bike) क्रमांकाची मोटारसायकल शिर्डीतही (Shirdi) फिरत असल्याचे स्पष्ट झाले. कारण शिर्डीत (Shirdi) या क्रमांकाच्या ज्युपिटर दुचाकीने वाहतूक नियम (Traffic Rules) मोडल्याच्या दंडाच्या चलनाचा मेसेज चार महिन्यापूर्वी पाचेगाव (Pachegav) येथील याच क्रमांकाची नवी मोटारसायकल खरेदी केलेल्या केलेल्या व्यक्तीच्या मोबाईलवर आला.
याबाबत माहिती अशी की, नेवासा (Newasa) तालुक्यातील पाचेगाव येथील विजय रावसाहेब गायकवाड यांनी चार महिन्यांपूर्वी बजाज कंपनीची मोटारसायकल घेतली असून जानेवारी महिन्यात वाहतूक शाखा विभागाकडून (Department of Transport Branch) त्यांच्या मोटारसायकलवर (Bike) दंड टाकण्यात आला, पण यांनी कोणत्याही प्रकारे नियम तोडला नसताना देखील मोटारसायकलच्या नंबरवर चलनाचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर (Mobile) आला. त्यात त्यांनी सखोल माहिती काढली असता धक्कादायक माहिती समोर आली.
त्याच क्रमांकाची दुसरी मोटारसायकल शिर्डी (Shirdi) परिसरात फिरत आहे. त्या गाडीने नियम तोडल्याने वाहतूक शाखा विभागाने (आरटीओ) (RTO) त्या क्रमांकावर चलन टाकले, पण तो भुर्दंड मात्र खर्या मालकाच्या गाडीवर आला. सदर खर्या मालकाने आपली रितसर तक्रार श्रीरामपूरच्या (Shrirampur) आरटीओ कार्यालयाकडे (RTO Office) तसेच शिर्डी पोलीस ठाणे (Shirdi Police Station) व वाहतूक शाखा अहमदनगर (Ahmednagar) तसेच पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.
वाहतूक शाखेच्या ऑनलाइन मेसेजवर त्याच क्रमांकाची गाडी दिसत आहे. सदर टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर ही गाडी आहे. त्या गाडीवर शिर्डी वाहतूक शाखेने दंड टाकला आहे. पण एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी कशा असू शकतात? हेदेखील शंकास्पद आहे.
सदर गाडीचा शोध घेऊन त्या गाडीची कागदपत्रे तपासावी. जेणेकरून पुढील काळात काही अनुचित प्रकार घडू नये व त्यात मला विनाकारण त्रास होऊ नये याची दखल घ्यावी.अशी मागणी त्यांनी सबंधीस विभागाकडे अर्जाद्वारे केली आहे.
खोट्या नंबरची दुचाकी ताब्यात घेणार
सदर क्रमांकाची गाडी शिर्डीत वाहतूक शाखेचे नियम मोडत फिरत असून सीसी टीव्ही फुटेजमध्ये कैद देखील झाली आहे. त्यामुळे ही खोट्या नंबरची गाडी दोन दिवसात ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करू अशी माहिती शिर्डी वाहतूक शाखेने अर्जदाराला दिली आहे.