हृदयद्रावक! पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू

हृदयद्रावक! पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू

राहुरी | प्रतिनिधी

राहुरी (rahuri) येथे दोन सख्ख्या भावाचा मुळा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमर पगारे ( वय १४ ) व सुमित पगारे (वय १२) असे मृत दोघा भावंडाची नावे आहे. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. (Two minor boys drown in mula river)

हृदयद्रावक! पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू
दुर्दैवी! पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचविताना वडीलांचाही मृत्यू

याबाबत माहिती अशी की, राहुरी (rahuri) येथील मुळा नदीवरील (Mula river) पुलाजवळील गणपती घाटानजिक (ganpati ghat) पाच जण पोहायला गेले होते. यापैकी अमर पगारे व सुमित पगारे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिक तरूणांनी तीन जणांना वाचविले. मात्र दोघेजण पाण्यात वाहून गेले.

हृदयद्रावक! पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू
जिल्ह्यात दुर्घटनांची मालिका; मासे पकडण्यासाठी गेलेली महिला व पुरुष ओढ्याच्या पाण्यात बुडाले

घटनेची माहिती समजताच राहुरी नगरपालिकेचे (rahuri nagar palika) पथक तातडीने अग्नीशामकसह दाखल झाले. बुडालेल्या दोन मुलांचा शोध सुरू आहे. नदीपात्रात सध्या मुळा धरणातून ८ हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आल्याने नदीला पूर आला आहे. त्यातच वाळू उपशामुळे नदीपात्रात सुमारे दहा फुटाहून अधिक खोलीचे डोह तयार झाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com