भाळवणीच्या कोविड सेंटरला पालकमंत्र्यांची दोन लाखांची मदत

कोविडच्या तिसर्‍या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज - ना. मुश्रीफ
भाळवणीच्या कोविड सेंटरला पालकमंत्र्यांची दोन लाखांची मदत

पारनेर (प्रतिनिधी) - करोना महामारीच्या काळात लोकांच्या कल्याणासाठी जीवावर उदार होऊन आ. निलेश लंके सारखा लोकप्रतिनिधी काय काम करू शकतो हे महाराष्ट्रातला दाखवून दिले आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आ. लंके या माझ्या शिष्याचा मला व पक्षाला अभिमान असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. तसेच लंकेंच्या आरोग्य मंदिरास दोन लाख रुपयांची मदत जाहीर करत करोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी बुधवारी भाळवणीच्या शरद पवार कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी आ. निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, जिल्हा परिषचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, सरपंच राहुल झावरे, जितेश सरडे, सुरज भुजबळ, संतोष भुजबळ, गटविकास अधिकारी किशोर माने, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, डॉ. बाळासाहेब कावरे, डॉ. मानसी मानोरकर, अशोक सावंत, दिपक लंके, बापू शिर्के, बाळासाहेब खिलारी, अनिल गंधाक्ते, अभयसिंह नांगरे, प्रमोद गोडसे, दत्ता कोरडे, मुकुंद शिंदे, नितीन मुरकुटे, संदीप चौधरी, श्रीकांत चौरे, सरपंच सचिन पठारे, सरपंच बाळासाहेब लंके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका पदाधिकारी तसेच नीलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री ना. मुश्रीफ म्हणाले, प्रत्येकाने किमान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर पाळले पाहिजे. तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी सरकार व प्रशासनाच्यावतीने तयारी केली आहे. तसेच हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे. केंद्र सरकारच्या निती आयोगाने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्य सरकारचे कौतुक केले आहे. म्युकरमायकोसिसबाबत प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरील राज्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. महाराष्ट्र राज्यातील 80 टक्के लसीकरण पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे. यावेळी जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, सात हजार 200 लोकांना या कोविड सेंटरचा लाभ मिळाला असून 1 हजार 200 लोकांना या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात आला. यावेळी आ. लंके यांनी ही मनोगत व्यक्त केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com