बांधाच्या कारणावरून मारहाण

शिरूर : परस्परविरोधी फिर्यादी : 9 जणांवर गुन्हा दाखल
बांधाच्या कारणावरून मारहाण

शिरूर (तालुका प्रतिनिधी) - शेतीचा बांध कोरला व शेतात ट्रॅक्टर घातला या कारणावरून कवठे येमाई येथे दोन गटांत मारहाण झाली. ही घटना बुधवारी (दि. 9) सायंकाळी घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून नऊ जणांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजी तुकाराम इचके (रा. काळुबाईनगर, कवठे येमाई, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास बंडू इचके, भरत कैलास इचके, सुनील कैलास इचके, रोहिदास बंडू इचके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या गट नंबर 242 मधील शेतीचा बांध कोरू दिला नाही म्हणून वरील चार आरोपींनी फिर्यादी इचके व त्यांच्या चुलत भावाला दगडाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसरी फिर्याद कैलास बंडू इचके (रा. इचकेवाडी, कवठे यमाई) यांनी दिली. त्यावरून नितीन सखाराम इचके, संभाजी तुकाराम इचके, तात्याभाऊ बाळासाहेब इचके, बाजीराव पांडुरंग इचके, संदीप सखाराम इचके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या बाजरी पेरलेल्या शेतात वरील पाच आरोपींनी ट्रॅक्टर नांगर घातला. त्याचा जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलांना लाकडी काठ्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com