श्रीगोंद्यात दोन गटात दंगल

दगडफेकसह मिर्चीची पुड डोळ्यात फेकली
श्रीगोंद्यात दोन गटात दंगल

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा (Shrigonda) तहसील कार्यालयासमोर (Tahsil Office) मंगळवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान एका विशिष्ट समाजातील दोन गटांमध्ये (Two Group Fight) झालेल्या वादातून (Dispute) तुफान दगडफेक (Stone throwing) झाली. यामध्ये दोन ते तीन जणांच्या डोक्याला मार लागुन ते जखमी (Injured) झाले आहेत. या भांडणामध्ये एकमेकांच्या डोळ्यात मिरची पावडर (Chili Powder) टाकण्यात आली.

यावेळी दगडफेकीत (Stone Throwing) तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेल्या काही दुचाकींचे नुकसान झाले आहे. कामानिमित्त येथे आलेल्या काही लोकांना देखील या दगडफेकीत (Stone Throwing) दगड लागले आहेत. शहरात आता रोजच असे वाद (Dispute) घडत असून कॉलेज परिसरातील देखील तरुणांच्या गटात असे वाद (Dispute) घडत आहेत. नेमक्या कोणत्या कारणातून हा वाद झाला हे मात्र स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती समजली. तहसील कार्यालयासारख्या एवढ्या गजबजलेल्या परिसरात अचानक झालेल्या या तुफान दगडफेकीच्या (Stone Throwing) घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com