
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी (Rahuri) शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दोन गटातील हाणामारीमुळे (Beating) कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काल दिनांक 31 जुलै रोजी रात्री सात जणांच्या टोळीने एका जणाला फायटर, रॉड व दांड्याने बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना घडली असून राहुरी शहरात (Rahuri) दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवार दिनांक 30 जुलै रोजी राहुरी शहरातील दोन तरूणांमध्ये किरकोळ वाद (Youth Dispute) झाले होते. ते मिटविण्यात आले होते. मात्र दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजे दरम्यान शहरातील शुक्लेश्वर चौक येथे दोन गटांत पुन्हा मारहाण (Beating) झाली. त्या नंतर दोन्ही गटातील शेकडो तरूण राहुरी पोलिस ठाण्यात (Rahuri Police Station) परस्पर विरोधात गुन्हे दाखल (Crimes Filed) करण्यासाठी आले होते. मात्र काही समजदार लोकांनी मध्यस्थी करून सदर वाद (Dispute) सामंजस्याने मिटवण्यात आला. मात्र रात्री दहा वाजे दरम्यान आजान फिरोज शेख हा तरूण त्याच्या काही मित्रां सोबत शुक्लेश्वर चौक येथे गप्पा मारत बसला होता. त्यावेळी सात तरूणांची टोळी त्या ठिकाणी आली.
दुपारी झालेल्या मारहाणीचा (Beating) राग मनात धरून त्यांनी आजान फिरोज शेख या तरूणाला फायटर, लोखंडी रॉड, लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण (Beating) केली. तसेच तुम्ही पुन्हा आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवे मारुन टाकू, अशी धमकी (Threat) दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा हे पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून सर्वचजण पसार झाले. आजान फिरोज शेख या तरूणाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी स्वप्निल कुसमुडे, ओंकार डहाके, निलेश शिरसाठ, अमोल शिरसाठ, सैफ शफी शेख, शिवा नागरे, शुभम चांदणे या सात जणांवर मारहाणीचा व जिवे मारण्याची धमकी (Threat) दिल्याचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक शिवाजी खरात हे करीत आहेत.