मेसेज पाठविल्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

पिंपरी घुमट येथील घटना || पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी
मेसेज पाठविल्याच्या वादातून दोन गटात  हाणामारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मोबाईलवर मेसेज पाठविल्याच्या वादातून दोन गटात पिंपरी घुमट (ता. नगर) येथे हाणामारी झाली. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे.

किशोर रेवननाथ होडगर (वय 39 रा. पिंपरी घुमट) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मोबाईलवर मेसेज का केला या कारणावरून तबाजी काशिनाथ होडगर व अशोक मुक्ताजी सुळ यांनी काठीने पाठीवर, दंडावर, खांद्याला मारहाण केली. यावेळी पळालो असता विकास रभाजी सुळ व सुभाष काशिनाथ होडगर यांनी पाठीत दगड फेकुन मारला. त्यानंतर रभाजी मुक्ताजी सुळ, विशाल रभाजी सुळ, दादा गंगा सुळ, पोपट बन्शी होडगर, बन्शी रखमा होडगर, बाबासाहेब रखमा होडगर, दिपक केशव होडगर यांनी लाथाबुक्कांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच सुभाष होडगर व तबाजी होडगर यांनी जिवे मारण्याची धमकी दिली.

विशाल रभाजी सुळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मारूती मंदिराजवळ असताना किशोर होडगर याने मुलाच्या मोबाईलवर मेसेज का केला या कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच अर्जुन होडगर याने लाथाबुक्कांनी मारहाण करून शिवीगाळ करत दुचाकीवर दगड टाकुन नुकसान करत घरातील लोकांचा काटा काढण्याचा दम दिला. पोलीसी अंमलदार. डी. बी. पवार तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com