
नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa
नेवासा तालुक्यातील कारेगाव येथे दोन कुटूंबात हाणामारीची घटना घडली असून याबाबत परस्परविरोधी फिर्यादीवरुन दोन्ही बाजूच्या 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अविनाश पंढरीनाथ मिरपगार (वय 24) धंदा-शेतमजुरी रा. कारेगाव ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आमचेविरुद्ध फिर्याद का दिली? या कारणावरुन 26 जुलै 2022 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मी व आई-वडील घरासमोर असताना तिथे संदीप ऊर्फ विनोद मानीयल सातदिवे, गोरख रघुनाथ सातदिवे, ओक ऊर्फ सचीन अनिल सातदिवे, कल्पना मानीयल सातदिवे व अल्का अनिल सातदिवे असे आले व आम्हाला म्हणाले की, आमचेविरुद्ध फिर्याद का दिली? या कारणावरुन अशोक ऊर्फ सचीन याने माझे वडीलांना गजाने मारहाण करुन इतर चौघांनी मला व माझी आई मिना मिरपगार हिला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
या फिर्यादीवरुन वरील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कॉन्स्टेबल श्री. गडाख करत आहेत. दुसरी फिर्याद संदीप मानीयल सातदिवे (वय 21) रा. कारेगाव यांनी दिली असून त्यात म्हटले की, 26 जुलै रोजी मी व आई आमचे चहापाणी घेत असातना अविनाथ पंढरीनाथ मिरपगार, पंढरीनाथ जगन्नाथ मिरपगार, मिना पंढरीनाथ मिरपगार, प्रीति अजित मिरपगार (चौघेही रा. कारेगाव ता. नेवासा), लक्ष्मण दावीद दळवी व येशूदास दावीद दळवी (दोघे रा. घेवरी ता. शेवगाव) हे माझ्या घरी आले व मला म्हणाले, तुझ्या वडीलाने आम्हाला काल शिवीगाळ का केली? या कारणावरुन अविनाथ पंढरीनाथ मिरपगार याने त्याच्या हातातील गजाने माझ्या डोकयात मारहाण केली तसेच माझी आई व चुलतभाऊ मध्ये आले असता माझे आईला लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली व माझा भाऊ अशोक याला पंढरीनाथ जगन्नाथ मिरपगार याने त्याच्या हातातील काठीने मारहाण केली तसेच इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन वरील सहा जणांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.