सोनसाखळी व रस्तालुटीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक
सार्वमत

सोनसाखळी व रस्तालुटीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक

कोतवाली पोलिसांची कारवाई

Nilesh Jadhav

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सोनसाखळी चोरीच्या व रस्तालुटीच्या गुन्ह्यात पसार असलेल्या दोघांना कोतवाली पोलिसांनी आज अटक केली. नवाज रौफ सय्यद (रा. बुरुडगाव रोड) व तन्वीर फकीर महम्मद देशमुख असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. २१ जानेवारीला सायंकाळी साडेचार वाजता दोघा जणांनी अशोक शंकरराव सायंबर (वय- ६४ रा. कायनेटीक चौक) यांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याची चैन चोरून धूम ठोकली होती. याप्रकरणी सायंबर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात यापूर्वी संकेत सुनील खापरे याला अटक केली होती. तर, त्याचा दुसरा साथीदार नवाज रौफ सय्यद हा पसार होता. सय्यद हा बुरुडगाव रोडवरील एका चाळीमध्ये राहत असलेल्या त्याच्या घरच्यांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक सतीष शिरसाठ यांच्या पथकाने बुरुडगाव रोडवर सापळा लावून आरोपीला अटक केली. तसेच, कोतवाली पोलीस ठाण्यात रस्तालुटीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या रस्तालुटीसाठी आरोपींना चारचाकी वाहने तन्वीर फकीर महम्मद देशमुख हा देत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. पथकाने देशमुख याचा शोध घेऊन त्याला नगर शहरातून अटक केली.

Deshdoot
www.deshdoot.com