नगरमधील दाेन पाेलिसांना कराेना

काही दिवसांपूर्वी मुख्यालयातील एका सहाय्यक फौजदाराला करोनाची लागण झाली होती
नगरमधील दाेन पाेलिसांना कराेना

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस हवालदार यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना क्कारंटाईन करण्यात आले आहे. पोलीस दलातही हळूहळू करोना वाढू लागला आहे.

करोना योद्धा म्हणून दिवसरात्र पोलीस अधिकारी व कर्मचारी काम करत आहे. गेल्या चार महिन्यापासून पोलीस दलात करोना रूग्ण आढळून आले नव्हते. परंतू, काही दिवसांपूर्वी मुख्यालयातील एका सहाय्यक फौजदाराला करोनाची लागण झाली होती. यात या सहाय्यक फौजदाराचा मृत्यू झाला. शहर पोलीस दलातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व दंगल नियंत्रण पथकातील चार पोलीस करोना पॉझिटीव्ह आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आता पुन्हा शहर पोलीस दलातील एक पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस कर्मचारी यांना करोनाची लागण झाली आहे. हे उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी काही दिवस दंगल नियंत्रण पथकासोबत होते. यामुळे किंवा पोलीस ठाण्यात येणार्‍या-जाणार्‍या लोकांच्या संपर्कात आल्याने त्यांना करोना संक्रमण झाले असल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून ते ठणठणीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना क्कांरटाईन करण्यात आले असून त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com