राहाता शहरात दोन व्यावसायिक करोना पॉझिटिव्ह; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

राहाता शहरात दोन व्यावसायिक करोना पॉझिटिव्ह; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

राहाता | वार्ताहर

राहाता (Rahata) शहरामध्ये भाजी व भेळ विक्रेते या दोन व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह (Corona test positive) आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राहाता शहरात दोन व्यावसायिक करोना पॉझिटिव्ह; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
विजेचा दाब वाढल्याने अनेक घरातील विजेची उपकरणे जळाली

राहाता नगरपालिका प्रशासनाने (Rahata Nagarpalika) शहरातील व्यवसायिकांना दर पंधरा दिवसांनी करोना चाचणी (Corona Test) करणे बंधनकारक आहे. अशा वारंवार सूचना देऊनही अनेक व्यवसायिक नगरपालिकेचे नियम धाब्यावर बसवत नियमाचे पालन करताना दिसत नाही. भाजी व भेळ विक्रेते यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्या दोन व्यवसायिकांना तात्काळ शिर्डी येथे उपचारासाठी पाठवले आहे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सात दिवस घराबाहेर येऊ नये अशा सूचना पालिका प्रशासनाने दिल्या आहेत. पालिका प्रशासनाने तात्काळ शहरातील सर्व व्यवसायिकाचै करोना प्रमाणपत्र तपासण्याची मोहीम हाती घेतली असून शुक्रवारी १२ व्यावसायिकांकडे करोना चाचणी केल्या नसल्याचे निदर्शनास आले.

राहाता शहरात दोन व्यावसायिक करोना पॉझिटिव्ह; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
तरुण शेतकऱ्याचा शेततळ्यात पडून मृत्यू

करोना महामारीमुळे (Corona epidemic) गेल्या दीड वर्षापासून देशात लॉकडाऊन (Lockdown) परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी सर्व व्यवसाय बंद असल्याने अर्थ चक्र ठप्प झाले. हातावर पोट असलेल्या व्यक्तींना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न भेडसावत होता. करोना संसर्ग थोड्या प्रमाणात कमी झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने नियम व अटी शितील करून नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी सर्वच व्यवहार सुरू करण्याची परवानगी दिली. सर्व व्यवहार सुरू झाल्याने नागरिकांची होणारी गर्दी व तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी संबंधित ग्रामपंचायत व नगरपालिका प्रशासन यांना करोना संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी शहरातील व्यवसायिकांची दर पंधरा दिवसाला करोना चाचणी बंधनकारक करून त्याचे प्रमाणपत्र दुकानात ठेवण्याचे आव्हान केले होते.

असे असतानाही शहरातील काही व्यवसायिक दर पंधरा दिवसाला करोना चाचणी करून घेत नाही. दुकानात कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंग पाळत नसुन मास्क ही वापर करत नसल्यामुळे करोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरुवारी राहाता शहरामध्ये एक भाजी विक्रेता महिला व भेळ विक्रेता पुरुष यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .

राहाता शहरात दोन व्यावसायिक करोना पॉझिटिव्ह; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
विखे कारखाना कामगार पतपेढीच्या कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या

दरम्यान, राहाता शहरात भाजी व भेळ विक्री या दोन व्यक्तींचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या व्यक्तींपासून आपल्याला संसर्ग होणार तर नाही अशी भीती अनेकांना वाटू लागली आहे. राहाता नगरपालिकेचे काही कर्मचारी व्यवसायिकांना उर्मट भाषेमध्ये प्रमाणपत्र आहे का नाही अशी विचारणा करतात व दुकानांवर कारवाई करण्याची भीती दाखवतात, परंतु व्यवसायांकडे प्रमाणपत्र आहे की नाही हे तपासल्या नंतरच कर्मचाऱ्यांनी दुकानावर कारवाई करावी अशी मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com