‘ते’ दोघे चिमुकले बालसुधार गृहाकडे सुपूर्द

‘ते’ दोघे चिमुकले बालसुधार गृहाकडे सुपूर्द

नेवासा बुद्रुक (वार्ताहर) / Newasa Budruk - नेवासा दुय्यम कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपींच्या दोन चिमुकल्या मुलांचा कारागृह परिसरात पोलीस निरीक्षक सांभाळ करत असल्याबाबतचे वृत्त दै. सार्वमतमध्ये प्रसिद्ध होताच सोमवारी पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या पुढाकाराने त्या दोन चिमुकल्या मुलांना अहमदनगर येथील बाल सुधार गृह येथे कायदेशीर पद्धतीने सुपूर्द करण्यात आले.

सकाळी या मुलांना पोलीस निरीक्षक विजय करे यांनी स्वखर्चाने दोघांना टी शर्ट, जीन्स पँट व दैनंदिन जीवनातील कपडे व खाऊ देऊन तसेच रॅपीड अँटीजेन टेस्ट करून पोलीस हवालदार तुळशीराम गीते व महिला पोलीस शिपाई श्रीमती शिंदे यांनी नगर येथील बाल कल्याण समिती येथे सुपूर्द केले. पोलीस निरीक्षक विजय करे आणि पोलीस कर्मचारी यांची ही आगळीवेगळी कामगिरी तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com