घरफोड्या करणार्‍या दोघांना अटक

कोतवाली पोलिसांची कामगिरी: सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
घरफोड्या करणार्‍या दोघांना अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात दिवसा घरफोडी (Burglary) करणार्‍या दोघांना कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) अटक केली आहे. किशोर तेजराव वायाळ (वय 45 रा. मेरा बुद्रुक ता. चिखली जि. बुलढाणा) व गोरख रघुनाथ खळेकर (वय 34 रा. शिरसवाडी ता. जि. जालना) असे अटक (Arrested) केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील एक लाख 30 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त (Gold jewelry Seized) करण्यात आले आहेत.

13 जुलै रोजी दुपारी चोरट्यांनी सारसनगर भागातील एका घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिणे असा दोन लाख 87 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी किशोर वायाळ व गोरख खळेकर यांना शिरूर (जि. पुणे) येथून ताब्यात घेत अटक केली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil), अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, शहर उपअधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस अंमलदार याकुब सय्यद, दीपक कैतके, सुमित गवळी, भागवत, मोहन मुनफन, भिंगारदिवे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

आरोपी वायाळ विरोधात जामनेर, भुसावळ (जि. जळगाव), खदान (जि. अकोला), पारध (जि. जालना), मुंकुदवाडी (जि. औरंगाबाद) पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहे. आरोपी खळेकरविरोधात सिडको, जिन्सी (जि. औरंगाबाद), शिरसवाडी (जि. जालना) पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास कोतवाली पोलीस (Kotwali Police) करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com