तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू

- कुठे घडली घटना ?
तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू

करंजी |वार्ताहार| Karanji

पाथर्डी तालुक्यातील (Pathardi Taluka) करंजी (Karanji) येथील दोन सख्ख्या भावांचा सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू (The Unfortunate Death of Drowning in a Lake) झाल्याने करंजी गावावर मोठी शोककळा पसरली आहे.

Title Name

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, करंजी (Karanji) येथील संदीप दत्तात्रय अकोलकर (वय 28) व बाप्पू दत्तात्रय अकोलकर (वय-22) हे दोघे सख्खे भाऊ सोमवारी सकाळी करंजी (KaranjI) येथील मुखेकरवस्ती जवळील बोरुडेचा पाझर तलाव (Lake) या ठिकाणी मेंढरं धुण्यासाठी गेले असताना यातील एकाचा मेंढरं धूत असतांना पाय घसरल्याने तो डोहात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ बापू देखील मदतीला धावला असता दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्यामुळे व पोहोता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू (Unfortunate Death by Drowning) झाला.

काही वेळाने मेंढर आहेत परंतु त्या सोबतची दोन तरुण मुलं कुठे आहेत. याबाबत आजूबाजूच्या लोकांची चर्चा सुरू झाली. त्यानंतर काही शेतकर्‍यांनी त्या डोहाजवळ येऊन पाहिले असता हे दोघे पाण्यात बुडाल्याचा अंदाज आल्याने काही तरुणांनी पाण्यात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे करंजी गावावर मोठी शोककळा पसरली असून पाथर्डी येथे शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी उशिरा या दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोन्ही तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे करंजीसह परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com