अज्ञाताने दोन दुचाकी पेटवल्या

अज्ञाताने दोन दुचाकी पेटवल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरासमोर रस्त्याच्या बाजुला उभ्या केलेल्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्या. रविवारी रात्री पावणे बारा वाजेच्या दरम्यान शनि मंदिरा शेजारी, टांगे गल्ली, नालेगाव येथे ही घटना घडली. याप्रकरणी सुनील अशोक एडके (वय 34) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांनी रविवारी रात्री त्यांची दुचाकी (एमएच 16 सीडब्ल्यू 6013) व शेजारी त्यांची बहिण अनिता भाऊसाहेब तेलोरे यांची दुचाकी (एमएच 45 एजे 675) उभी केली होती. रात्री पावणे बारा वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने या दोन्ही दुचाकींवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com