बेलपिंपळगाव येथे शॉर्टसर्किटने दोन एकर ऊस व ठिबक जळाले

बेलपिंपळगाव येथे शॉर्टसर्किटने दोन एकर ऊस व ठिबक जळाले

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) बेलपिंपळगाव (Belpimpalgav) येथे शॉटसर्किट (Shortcircuit) होऊन गावातील शेतकरी अप्पासाहेब गजाबापू रोटे व कारभारी गजाबापू रोटे यांच्या गट नं 322 मधील दहा महिन्यांचे उसाचे पीक (Sugarcane Crops) व त्यातील ठिबक (Drip) जळाले.

सध्या कोणताही कारखाना तसेच गुर्‍हाळ सुरू नसल्याने हा ऊस (Sugar Cane) शेतातच महिनाभर तरी पडून राहिल्याने त्याच्या खोडक्या होणार आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे किमान दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे अप्पासाहेब रोटे यांनी सांगितले. आमच्या शेतातून जी मेन लाईन गेली आहे तिच्यावर महावितरणने सिंगल फेज लाईन टाकलेली आहे. ती काढून स्वतंत्र पोलवरून न्यावी. त्यामुळे शेतकर्‍यांना त्रास होणार नाही अशी महावितरणकडे मागणी केली होती. परंतु महावितरणने मागणीकडे लक्ष दिले नाही त्यामुळे हा अनर्थ घडला.

शेजारी व मित्र मदतीला धावून आले नसते तर किमान शंभर ते दीडशे एकर उसाचे पीक (Sugar Cane Crops) डोळ्यादेखत जळताना पाहण्याची वेळ आली असती. जे नुकसान झाले आहे. त्याला महावितरण जबाबदार असल्याने आम्हाला त्यांच्या कडून भरपाई मिळाली नाहीतर आम्ही सहकुटुंब महावितरणपुढे आंदोलन करणार असल्याचे रोटे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.