आई तुळजा भवानीच्या मंदिराच्या पायथ्याला आढळले भूयार

भुयाराचे कोडे उलगडलेच नाही
आई तुळजा भवानीच्या मंदिराच्या पायथ्याला आढळले भूयार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, राहुरीची (Rahuri) माहेरवाशीण आई तुळजाभवानीच्या (Aai Tuljabhavani Temple) राहुरी शहरातील (Rahuri City) मंदिराच्या पायरी जवळ काल सकाळी सुमारे 20 फूट खोलीवर एक भूयार (Basement) आढळून आले आहे. भुयार (Basement) पाहण्यासाठी तोबा गर्दी (Crowd) झाली. या घटनेबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे. काही धाडसी तरूणांनी आत उतरून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधारामुळे त्यांना पुन्हा माघारी यावे लागले.

आई तुळजा भवानीच्या मंदिराच्या पायथ्याला आढळले भूयार
जिल्हा परिषद गट, गण रचनेचा कार्यक्रम जाहीर

दरम्यान, पालिका प्रशासनाने (Municipal Administration) ते भूयार (Basement) भर टाकून बुजविल्याने भुयाराचे (Basement) रहस्यही त्यातच बंदिस्त झाले. जुन्या जाणत्या नागरिकांनाही या भुयाराचे कोडे उलगडले नाही.

राहुरी शहरातील (Rahuri City) जंगम गल्ली येथे आई तुळजाभवानी मातेचे मंदिर (Aai Tuljabhavani Mata Temple) आहे. काही दिवसांपूर्वी मंदिराच्या पायरीजवळ एक छोटा खड्डा पडला होता. सुरूवातीला ते घुशीचे बीळ असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष (Ignore) करण्यात आले. मात्र, दोन दिवसानंतर तो खड्डा मोठा झाल्याचे दिसून आले. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी बारकाईने लक्ष दिले. खड्ड्यात बांबू टाकून पाहिला असता तो खड्डा (Pit) खूपच मोठा असल्याचे जाणवले.

आई तुळजा भवानीच्या मंदिराच्या पायथ्याला आढळले भूयार
मंडल अधिकार्‍यापाठोपाठ मद्यधुंद तलाठ्यालाही मारहाण

या घटनेबाबत नागरिकांनी राहुरी नगरपरिषद प्रशासनाला माहिती दिली. त्यानुसार काल दि. 12 मे रोजी सकाळी नगरपरिषद प्रशासनाकडून जेसीबी मशीन बोलावून तो खड्डा उकरण्यात आला. त्यावेळी मंदिराच्या खालच्या बाजूला सुमारे 20 फूट खोल खड्डा पडून त्या ठिकाणी भूयार आढळून आले आहे. ही घटना शहरात वार्‍यासारखी पसरली. भूयार पाहण्यासाठी अनेकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली.

आई तुळजा भवानीच्या मंदिराच्या पायथ्याला आढळले भूयार
मथुरा श्रीकृष्ण मंदिर समितीच्या विश्वस्तपदी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांची नियुक्ती

शहरातील विकी दिवे व गोरख चौधरी या दोन तरूणांनी हिम्मत करून कमरेला दोरी बांधून ते खाली उतरले. मात्र, खाली पूर्ण अंधार असल्याने काही दिसले नाही. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने तर्क वितर्क काढत आहेेत. पुरातन काळातील बळद असेल तर कोणी सांगतात, भुयार असेल. मात्र, निश्चित काही समजू शकले नाही.

आई तुळजा भवानीच्या मंदिराच्या पायथ्याला आढळले भूयार
तुरुंगात भेटायला आले नाही म्हणून कोंढवडच्या बापलेकांवर कोयत्याने वार

यावेळी हर्ष तनपुरे, सुरेश धोत्रे, इम्रानभाई शेख, रमेश जंगम, इलियास आतार, अर्जुन बुर्‍हाडे, दीपक नागरे, दिलीप चौधरी, सुहास कोळपकर, संतोष नागरे, नारायण धोंगडे, सोमा विधाटे, स्वप्नील ढवळे, सौरभ दुधाडे, अमृत उदावंत, नगरपरिषदेचे कर्मचारी बाबा गुंजाळ, दिगंबर शिंदे आदी घटनास्थळी उपस्थित होते. दुपारनंतर नगरपरिषद प्रशासनाकडून भर आणून तो खड्डा बुजविण्याचे काम सुरू होते. मात्र शहरात दिवसभर या घटनेची चर्चा सुरू होती.

Related Stories

No stories found.