तुळजापूरच्या भवानीची पालखी राहुरीतून तुळजापूरला रवाना

तुळजापूरच्या भवानीची पालखी राहुरीतून तुळजापूरला रवाना

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

करोनाच्या महामारीमुळे गेली दोन वर्षे बंद असलेली पालखी मिरवणुकीची प्रथा यावर्षी पुन्हा सुरू झाल्याने भाविकांनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आज तुळजापूरच्या भवानी मातेच्या पालखीचे विधिवत पूजन करून साडी-खणा नारळाने ओटी भरून शहरातून सजलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली मधून मिरवणूक काढली.

तुळजापूरला नवरात्री उत्सवात मोठे मानाचे स्थान असलेल्या व राहुरीत विविध समाजाच्या सहभागातून तयार झालेल्या भवानी मातेच्या पालखीची विधिवत पूजा बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे व सौ. सायली तनपुरे, नगराध्यक्ष अनिल कासार, तेली समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे व सौ. वंदना सोनवणे तसेच सौ. कांचन व संदीप सोनवणे, आसाराम शेजूळ यांनी पालखीचे व देवीचे विधिवत पूजन करून साडी-चोळी, खणा नारळाने ओटी भरून पूजा केली.

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस उपनिरीक्षक शोभा डोखे, ताराचंद तनपुरे, म्हसे महाराज यांनी पूजा केली.आरती होऊन पालखी पुढील प्रवासास रवाना करण्यात आली. पालखी मंदिरातून बाहेर पडल्यावर मानकरी अण्णासाहेब शेटे, नगरसेविका नमिता शेटे, नरेंद्र शेटे, सागर शेटे यांनी तसेच सौ व श्री सुरेश करपे यांनी पूजा केल्यावर पालखी खेळविण्यात आली. नवरात्रीच्या काळात नवमीला भवानी मातेची मूर्ति याच पालखीतुन मिरवणूक काढली जाते.

नंतर ती होमात टाकली जाते व तिचा जो दांडा आहे तो परत राहुरी येथे आणून दरवर्षी सदर पालखी विविध समाजाच्या सहभागातून तयार केली जाते. ही पालखी घटस्थापनेच्या दिवशी तुळजापूर येथे सर्वत्र मिरवत पोहच केली जाते.अशी प्रथा असलेल्या ह्या पालखीला राहुरीकरांकडून एक उत्सव म्हणून बघितले जाते. पालखी तयार करण्याचा जसा मान विविध समाजाला आहे. तसाच मान ही पालखी रवाना करताना बिविध समाजाला मान आहे. यावेळी मंदिरात अनेकांनी पालखीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

भवानी मातेच्या मंदिरात शहराध्यक्ष संजय पन्हाळे बुर्‍हाणनगर येथील सर्व पालखीचे पुजारी विजय भगत, अभिषेक भगत, वसंत भगत, नामदेव महाराज शेजुळ, अजय इंगळे, बाळासाहेब शेजूळ, कैलास शेजुळ, राजेंद्र करपे, मोहन करपे, किशोर इंगळे, राजेंद्र इंगळे, सुनील पवार, विजय करपे ,सचिन तनपुरे, संतोष आघाव, संतोष तनपुरे, पांडुरंग उदावंत, रवींद्र तनपुरे, संजीव उदावंत, प्रकाश भुजाडी, विलास तनपुरे, पेंटर सोनार, नारायण धोंगडे, प्रमोद सुराणा, शिवाजीराव डौले य राजेंद्र बोरकर आदिंसह महिला पुरुष भाविक उपस्थित होते.दरवर्षी सदर पालखी शहरातून मिरवत जाऊन नगरपालिकेच्या वतीने मानकर्‍यांचा सत्कार व पालखीची साडी चोळी खणा नारळाने ओटी भरून बोलवण केली जाते.

त्यानंतर शहरातील प्रत्येक भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून पालखी शहरातून मिरवत रात्री 7 ते 8 वाजता मुळा नदीतून देसवंडी, तमनर आखाडा येथे रवाना केली जाते. आजचे वैशिष्ट्य म्हणजे मुळा नदी पात्रात धरणातून 5000 क्यूसेसने पाणी सुरु असल्याने दुथडी भरून वाहत असलेल्या पाण्यातून कोळी, डोहार, चांभार समाजाचे मानकरी पालखी तरफ्यावरून नदी पार करून देतात. हे पाहण्यासाठी भाविकांची नदी काठी मोठी गर्दी उसळते. परंपरेने पालखीची माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांंनी कार्यकर्त्यांसह मंदिरात येऊन पूजा केली व दर्शन घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com