तुकाई योजना प्रलंबित ठेवण्याचे पाप महाविकास आघाडीचे

आपल्यामुळेच वनविभागाची परवानगी मिळाल्याचा दावा
आ. राम शिंदे
आ. राम शिंदे

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

महाविकास आघाडी सरकार असताना विविध विकास कामांमध्ये खोडा घालण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधी करत होते. 3 वर्षे तुकाई उपसा सिंचन योजनेचे काम प्रलंबित ठेवण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले. आता आपले सरकार असल्याने आपण एका दिवसात सर्व परवानग्या मिळवल्या असून रखडलेले हे काम आता सुरू करणार आहोत, असे भाजपाचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी म्हटले आहे.

लोकप्रतिनिधी यांनी या प्रकल्पावर अघोषित स्थगिती लावली होती. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये तुकाई उपसा सिंचन योजनेची खिल्ली उडवणारे विद्यमान लोकप्रतिनिधी हे परवानग्या मिळाल्यानंतर मात्र प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधी हे श्रेयवादामुळे या कामाकडे जाणिपूर्वक दुर्लक्ष करत होते. परंतु त्यांच्या सरकारच्या काळात तुकाई उपसा सिंचन योजनेचे काम प्रलंबित का ठेवले? याचे उत्तर मात्र ते देणार नाहीत, असेही आरोप आमदार शिंदे यांनी केले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com