ट्रक खरेदीच्या व्यवहारात फसवणूक

10.64 लाखांना चुना || तोफखान्यात गुन्हा
ट्रक खरेदीच्या व्यवहारात फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

साडेबारा लाख रूपयांना ट्रकची खरेदी करत त्यापैकी एक लाख 95 हजार रूपये देऊन ताबा घेतला. मात्र, ठरल्याप्रमाणे नऊ लाख 65 हजार रूपये कर्ज न फेडता, उर्वरित 99 हजारांची रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकील रफियोद्दीन शेख (वय 48 रा. व्हिनसेनपुरा, सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. ज्ञानेश्वर निवृत्ती खोले (रा. बोधेगाव ता. शेवगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

शेख यांनी राजेंद्र नारायण शेटे (रा. रास्तापुर ता. नेवासा) यांच्याकडून ट्रकची खरेदी केली होती. त्यानंतर लगेचच 4 ऑक्टोबर 2021 रोजी ज्ञानेश्वर निवृत्ती खोले यांना ट्रक विकली. खोले यांनी 12 लाख 50 हजार रूपयांना ट्रक खरेदी करून ट्रकचा ताबा घेतला. रकमेपैकी एक लाख 95 हजार रूपये देऊन सदर ट्रकवर असलेले चोला फायनान्सचे नऊ लाख 65 हजार रूपये कर्ज त्यांनी फेड करण्याचे व उर्वरित राहिलेली रक्कम 99 हजार रूपये परत देण्याचे कबूल करत शेख व मूळ मालक राजेंद्र शेटे यांचा विश्वास संपादन केला.

खरेदी व इसार पावती, वाहन खरेदी पावती व करारनामा लिहून दिला. उर्वरीत रक्कम करारापासून 8 ते 10 दिवसाचे आत देण्याचे ठरले होते. मात्र, खोले यांनी विश्वासघात करत शेख व शेटे यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com