मालट्रकच्या अपघातात क्लिनर ठार

पाथर्डीतील माणिकदौंडी घाटात दुर्घटना
मालट्रकच्या अपघातात क्लिनर ठार

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील माणिकदौंडी घाटामध्ये (Manikdaundi Ghat) केळवंडी गावाच्या (Kelwandi Villages) हद्दीत मालट्रक पलटी (Truck Overturned) होऊन झालेल्या अपघातात (Accident) क्लीनर रवींद्र उर्फ रविराज बप्पासाहेब खंडेभराड वय 24( रा डोमेगाव ता.अंबड जि. जालना) याचा जागीच मृत्यु (Cleaner Death) झाला आहे.

आपघाताची माहिती मिळताच पाथर्डी पोलिस स्टेशनचे (Pathardi Police Station0 पोलीस कर्मचारी अतुल शेळके, ईश्वर गर्जे, वाहन चालक राजेंद्र सुद्रुक यांनी घटनास्थळी धाव घेतली. बारामतीहून (Baramati) कांदा (Onion) घेऊन जालन्याकडे जाणारा दहा चाकी मालट्रक (क्रमांक एमएच 21 एक्स 299) गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने माणिकदौंडी घाटाच्या (Manikdaundi Ghat) धोकादायक वळणावर मालट्रक पलटी (Truck Overturned) झाला.या घटनेत गाडीतील क्लीनर रवींद्र उर्फ रविराज खंडेभराड गाडीखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला. हि घटना मंगळवारी पहाटे घडली आहे.

अपघातानंतर (Accident) मृत रवींद्रला ट्रकखालून काढून त्याला रुग्णालयात दाखल (Hospital) करण्यात आले. मात्र त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. मयत रवींद्रचे वडील बप्पासाहेब खंडेभराड यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात (Pathardi Police Station) याबाबत फिर्याद दिली असून ट्रकचालक संदिप दत्ता भडांगे याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश म्हस्के करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com