
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
तालुक्यातील नेवासाफाटा (Newasa Phata) ते भानसहिवरा (Bhanashivara) रस्त्यावर ऊसाने भरलेल्या भरधाव ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून (Truck Motorcycle Accident) जोराची धडक दिल्याने देडगाव (Dedgav) येथील महिला ठार (Woman Death) झाल्याची घटना सोमवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत सखाहारी पांडुरंग मुंगसे (वय 60) धंदा शेती रा. देडगाव ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, सोमवारी सकाळी पत्नी लंकाबाई सखाहरी मुंगसे हिस नेवासाफाटा (Newasa Phata) येथील हॉस्पीटलमध्ये माझी वैद्यकीय उपचारासाठी माझे कडील बजाज सीटी 100 मोटारसायकल (एमएच 17 बीके 1614) वरुन घेवून आलो होतो.
तेथे औषधोपचारानंतर दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास मी व पत्नी वरील मोटार सायकलवरुन नेवासा फाटा (Newasa Phata) ते भानसहिवरा रोडने घराकडे जात असताना हंडिनिमगाव शिवारातील सावता सर्व्हिस सेंटरच्यापुढे जात असताना आमच्या पाठीमागून भरधाव येणार्या ऊसाने भरलेल्या ट्रकने (एमएच 43 ई 2421) आम्हास पाठीमागून जोराची धडक (Accident) दिल्याने अपघात होवून मी मोटारसायकलसह रोडच्या डाव्या बाजूला पडलो तर पत्नी लंकाबाई ही रोडवर पडल्याने ट्रकचे चाक तिचे पोटावरुन गेल्याने ती जागेवरच मयत (Death) झाली.
या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी (Newasa Police) ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 175/2023 भारतीय दंड विधान कलम 304 (अ), 279, 337, 338, 427 सह मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.