नेवासा l तालुका प्रतिनिधीl Newasa

तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात नगर-औरंगाबाद रस्त्यावर ट्रकला

मोटारसायकल आडवी लावून ट्रक चालकास लुटल्याची घटना दि.20 फेब्रुवारी रोजी घडली आहे. याबाबद नेवासा पोलीस ठाण्यात शहाबुद्दीन गुलामवारीस मोहम्मद (वय 21 वर्ष) यांनी फिर्याद दिली आहे.

याबात सविस्तर माहिती अशी की, मुंबईहून माल भरुन परळीमार्गे शहाबुद्दीन गुलामवारीस मोहम्मद हे आपल्या ट्रकमधून रांची, झारखंडकडे जात होते. रविवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारातील ईसार पेट्रलपंपाच्याजवळ त्यांच्या ट्रकला तीन जणांनी अडवले. त्यानंतर त्या अज्ञात इसमांनी शहाबुद्दीन गुलामवारीस मोहम्मद यांच्या गळ्याला चाकू लावत व मारहाण करीत त्यांच्याकडील काही रोख रक्कमेसह 13 हजार 500 रुपयांचा ऐवज घेऊन अज्ञात इसमांनी अहमदनगरच्या दिशेने पोबारा केला. याबाबतचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहेत.