ट्रक-कंटेनरच्या अपघातात दोघांचा मृत्यू

शेंडी बायपास चौकातील घटना || पोलीस जखमी
ट्रक-कंटेनरच्या अपघातात दोघांचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-औरंगाबाद महामार्गावरील (Nagar Aurangabad Highway) शेंडी बायपास (Shendi Bypass) (ता. नगर) चौकात रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात (Accident) दोनजण जागीच ठार (Death) झाले, तर एक पोलीस कर्मचारी जखमी (Police Injured) झाल्याची घटना घडली.

ट्रक-कंटेनरच्या अपघातात दोघांचा मृत्यू
राष्ट्रवादीने 40 पेक्षा कमी संख्या होऊ नये, एवढेच पाहावे

औरंगाबादकडून नगरकडे जाणार्‍या ट्रकला (एमएच 43 वाय 7740) पाठीमागून कंटेनरने (एमएच 12 जेएस 9199) जोरदार धडक दिल्याने अपघात (Truck Container Accident) घडला. हा अपघात शेंडी बायपास चौकात घडला असून, धडक दिलेल्या कंटेनरमध्ये लोखंडी सळ्या होत्या. त्या केबिनमध्ये घुसल्याने कंटेनरमधील कृष्णा रघुनाथ सानप (वय 25, रा. रामनगर, ता. गेवराई, जि. बीड) व एका अज्ञात इसमाचा जागेवरच मृत्यू (Death) झाला. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.

ट्रक-कंटेनरच्या अपघातात दोघांचा मृत्यू
10.3 टन सोने अन् 16 हजार कोटी बँकेत

चौकात बंदोबस्तासाठी असणारे पोलीस कर्मचारी संभाजी खलाटे जखमी झाल्याची माहिती मिळाली. वाहतूक बंदोबस्तासाठी असणार्‍या इतर पोलिसांनी तत्परता दाखवत बाजूला गेल्याने ते बचावले. शेंडी बायपास चौकात अपघातांची मालिका सुरूच आहे. मागील 15 दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात बहिरवाडी येथील चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता.

ट्रक-कंटेनरच्या अपघातात दोघांचा मृत्यू
नारायणडोह शिवारात आढळली तोफगोळा सदृश वस्तू

त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी तीव्र रास्ता रोको आंदोलन करत येथे सिग्नल व इतर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. अपघातानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे व त्यांच्या सहकार्‍यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

ट्रक-कंटेनरच्या अपघातात दोघांचा मृत्यू
कोचिंग क्लास का वाढतात, याचे आत्मपरीक्षण करा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com