मालट्रकची दुचाकीला धडक; तरूणाचा मृत्यू

मालट्रकची दुचाकीला धडक; तरूणाचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मालट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरूणाचा मृत्यू झाला आहे. गणेश शिवाजी जाधव (वय 27 रा. निंबळक ता. नगर) असे मृत तरूणाचे नाव आहे.

निंबळक बायपास रोडवर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा अपघात झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मालट्रक (एमएच 18 एम 5930) चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल शिवाजी जाधव (वय 31 रा. निंबळक ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

गणेश जाधव निंबळक बायपास रोडवरील सुरेश संसारे यांच्या घरासमोरून दुचाकीवर रस्ता ओलांडत असताना त्यांच्या दुचाकीला केडगावच्या दिशेने जाणार्‍या मालट्रकने धडक दिली. या धडकेत गणेश यांचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार लाळगे करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com