ट्रकच्या धडकेने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

ट्रकच्या धडकेने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

ट्रकच्या (Truck) धडकेने वृद्धेचा मृत्यू (Death Old Woman) झाल्याची घटना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावर (Nashik-Pune National Highway) संगमनेर बस स्थानकाजवळ (Sangamner Bus Stand) घडली. नागपंचमीच्या दिवशी हा अपघात (Accident) झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रकच्या धडकेने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मनसेचे प्रकल्प कार्यालय राजूर येथे ठिय्या आंदोलन

तालुक्यातील ओझर (Ojhar) येथे राहणारे कारभारी शिंदे (वय 75) हे आपली पत्नी विमल शिंदे (वय 70) यांच्यासह दुचाकीहून संगमनेरला (Sangamner) आले होते. संगमनेर बस स्थानकाजवळ (Sangamner Bus Stand) या वृद्ध दाम्पत्याच्या वाहनाला रस्त्यावरील दुसर्‍या वाहनाचा धक्का लागल्याने वृद्ध महिला (Old Woman) खाली पडली. यावेळी महामार्गावरून जाणार्‍या मालवाहतूक ट्रकखाली सदर महिला सापडली. या अपघातात (Accident) सदर महिलेला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू (Death) झाला.

ट्रकच्या धडकेने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन वेश्या व्यवसायास लावले

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे आपल्या सहकारी कर्मचार्‍यांसह अपघात स्थळी पोहोचले. यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याने गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त वाहने बाजूला घेत जखमी (Injured) असलेल्या कारभारी शिंदे यांना रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल (Filed a Case) केला असून ते पुढील तपास करीत आहे.

ट्रकच्या धडकेने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
एस.टी.पी. प्लांट कृती समितीचे कार्यकर्ते आक्रमक
ट्रकच्या धडकेने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
सहकारी संघांमुळेच दुधाला भाव - आ. थोरात
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com