
नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa
शनिवारी सायंकाळी नेवासाफाटा (Newasa Phata) येथे एसटी बसने उतरुन पायी रस्ता ओलांडत असताना ट्रकने धडक दिल्याने (Truck Accident) शिरसगावच्या शेतकर्याचा जखमी (Farmer Injured) होवून उपचार सुरु असताना मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन ट्रकचालकावर अपघातासह (Accident) मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
याबाबत अर्जुन नारायण गवारे (वय 36 धंदा शेती रा. शिरसगाव ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, माझे वडील नारायण रेवजी गवारे (वय 57) धंदा-शेती रा. शिरसगाव हे दि. 18 रोजी खासगी कामासाठी नेवासा येथे गेले होते. नगर ते औरंगाबाद जाणारे रोडवरील (Nagar Aurangabad Road) आंबेडकर चौक नेवासाफाटा येथे रस्ता ओलांडत असताना नगरकडून येणारी ट्रक (एमएच 21 एक्स 9977) हिच्यावरील अज्ञात चालक याने त्याचेकडील ट्रक ही रस्त्याचे परिस्थीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून नारायण गवारे यांना जोराची धडक देवून अपघातास (Accident) कारणीभूत झाला. जखमी नारायण गवारे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना रात्री 8 वाजता ते मयत झाले.
अपघातात (Accident) मयत यांना कोणत्याही प्रकारची मदत न करता व अपघातातची (Accident) खबर न देता ट्रकचालक पळून गेला. या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नं. 224/2023 भारतीय दंड विधान कलम 304(अ), 279, 337, 338, मोटार वाहन कायदा कलम 184, 134(अ) (ब)/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.