त्रिंबकपूर सोसायटीत ग्रामविकास मंडळाचे वर्चस्व

त्रिंबकपूर सोसायटीत ग्रामविकास मंडळाचे वर्चस्व

मुसळवाडी |वार्ताहर| Musalwadi

राहुरी तालुक्यातील त्रिंबकपूर सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष माधवराव आढाव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संभाजीराव कोळसे, सरपंच बबनराव आढाव यांच्या मार्गदर्शनाखालील ग्रामविकास मंडळाने सर्वच्या सर्व बारा जागेवर दणदणीत विजय मिळविला. तर विरोधी परिवर्तन मंडळाचा दारुण पराभव झाला.

निवडणुकीमध्ये 369 पैकी 360 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात आठ मते अवैध ठरली. एकूण 13 जागेपैकी विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाचा प्रतिनिधी नसल्याने ती जागा रिक्त राहून तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी मतदारसंघातून ग्राम विकास मंडळाचे पंढरीनाथ माळी हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने बारा जागेपैकी अकरा जागेसाठी निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी एस. वाय. आगळे यांनी निकाल घोषित केला.त्यांना संस्थेचे सचिव मच्छिंद्र कोळसे, बाळासाहेब माळवदे, शिवाजी खामकर, पोपटराव बोंबले, विजय शेळके, कृष्णा मगर, बाळासाहेब धसाळ, यांनी सहाय्य केले.

सायंकाळी उशिरा मतमोजणी झाल्यानंतर ग्रामविकास मंडळाचे नानासाहेब शेळके (228), चंद्रकांत आढाव (227), जालिंदर कोळसे (221), रावसाहेब कोळसे (221), सुरेश कोळसे (221), शिवाजी शेळके (215), रावसाहेब पवार (206), भाऊसाहेब जाधव (204), पंढरीनाथ माळी (बिनविरोध), रंजना जवरे (216), मंगल काळे (213), ज्ञानदेव आढाव (209) या उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. याप्रसंगी नवनिर्वाचित संचालक मंडळाचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य विलास पवार, रेवनाथ कोळसे, संभाजी कोळसे, रावसाहेब पवार आदींची भाषणे झाली. यावेळी देवळाली प्रवरा सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र ढूस, बाबासाहेब पठारे, संतोष कदम, सूर्यभान जाधव, राहुल महाकाळ, म्हस्के, खिलारी, बाबासाहेब शेळके, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष गोरक्षनाथ कोळसे, उपाध्यक्ष राजेंद्र आढाव, अण्णासाहेब शेळके, भाऊसाहेब माळी, नानासाहेब कोळसे, सर्जेराव जाधव, सीताराम हरिचंद्रे, जगन्नाथ आढाव, मच्छिंद्र शेळके, राजेंद्र शेळके, अर्जुन माळी, विलास कोळसे, गफार इनामदार, बाळासाहेब बडाख, योगेश कोळसे, विलास आढाव, बाळासाहेब आढाव, बंडू कोळसे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. दीपक आढाव यांनी तर संजय जाधव यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.