सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्‍न; चिठ्ठी लिहून घेतले विष

सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्‍न; चिठ्ठी लिहून घेतले विष

राहुरी l प्रतिनिधी

खाजगी सावकाराचा (Private lender) सततचा तगादा आणि मानसिक जाच या त्रासामुळे हतबल झालेल्या राहुरी (Rahuri) तालुक्यातील मानोरी (Manori) परिसरातील गणपतवाडी भागातील ज्ञानदेव विठ्ठल शेळके या शेतकर्‍याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्‍न; चिठ्ठी लिहून घेतले विष
तळ्यात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; पालकांनी केला 'हा' आरोप

दरम्यान, त्यांना तातडीने नगर येथील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. आपल्यानंतर आपल्या कुटुंबियांना त्रास होऊ नये, यासाठी त्या शेतकर्‍याने राहुरी पोलीस निरीक्षकाच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवून मरणोत्तर न्याय देण्याची मागणी केली आहे. या चिठ्ठीत संबंधित सावकारांचे नावे नसून त्यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे. त्यामुळे राहुरीचे पोलीस निरीक्षक या घटनेबाबत आता काय दखल घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्‍न; चिठ्ठी लिहून घेतले विष
पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह ९ जणांविरोधात गुन्हा

काय लिहिले आहे चिठ्ठीत?

'मा.पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन राहुरी जि.अहमदनगर यांच्या कडेस मी स्वतः श्री.ज्ञानदेव विठ्ठल शेळके राहणार मानोरी ता.राहुरी जबाब लिहुन देतो की, मी तीन वर्षांपूर्वी मानोरी गावातील चार लोकांकडून व्याजाने पैसे घेतले आहे. त्याचे आजपर्यंत व्याज दिले आहे. त्या लोकांना मी स्टेट बँकेचे चेक दिलेले आहे. सदर लोकांनी मला वारंवार पैक्षाची मागणी करूण मानसिक ञास दिला. त्या ञासाला कंटाळून मी आज रोजी आत्महत्या करीत आहे. याबाबत माझ्या कुटूंबियाची यात कोणताही प्रकारची चुक नाही त्यांना कुणीही ञास देऊ नये हि विनंती तसेच साहेब मी मेल्यानंतर माझ्या कुटूंबियांना ञास देऊन पैक्षाची मागणी करूण ञास देतील तरी त्यांच्या पासून माझ्या कुटूंबियांचे संरक्षण करावे. या लोकांना मी मुद्दल रक्कम पैक्षा जास्त व्याज दिले आहे. तसेच माझे बंधू सोपान व रामदास यांना विनंती आहे की, आपल्या आईचा (बाई) सांभाळ करावा व तीचा शेवट गोड करावा हीच माझी शेवटची इच्छा हि विनंती. माझ्या आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरू नये विनंती.' अशा आशायची चिठ्ठी लिहुन या शेतक-याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Stories

No stories found.