प्रत्येकाने घरावर तिरंगा फडकवावा - आयुक्त डॉ. जावळे

शहरात अभियानाच्या जनजागृतीस प्रारंभ
प्रत्येकाने घरावर तिरंगा फडकवावा - आयुक्त डॉ. जावळे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तिरंगा राष्ट्राचा अभिमान व अस्मिता असून, अमृत महोत्सवी वर्ष ऐतिहासिक करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा. या अभियानात प्रत्येकाने मनापासून सहभागी होण्याचे आवाहन, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरू असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियान घरोघरी पोहचविण्यासाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ महिला ब्रिगेड व विजया लक्ष्मण काळे फाउंडेशनच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी आयुक्त डॉ. जावळे बोलत होते. प्रोफेसर चौक येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनिता काळे, शहर अभियंता सुरेश इथापे, विद्रोही साहित्य विचारमंचचे सुभाष सोनवणे, मिनाक्षी जाधव आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आयुक्त डॉ. जावळे म्हणाले, महापालिकेच्या माध्यमातून शहरात 33 केंद्रांवर तिरंगा झेंडा पुरविण्याचे काम सुरू आहे. फाउंडेशनने राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असून, ध्वजाची संहिता पालन करून या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग नोंदविण्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com