घरांवर फडकणार तिरंगा झेंडा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; मनपाचा पुढाकार
घरांवर फडकणार तिरंगा झेंडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत अहमदनगर शहरात ‘हर घर झेंडा’ उपक्रम महापालिकेच्या पुढाकारातून राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने 75 हजार 960 घरांवर तिरंगा झेंडा फडकाविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. या उपक्रमांतर्गत महापालिकेच्या स्टॉल लावून नागरिकांसाठी सशुल्क झेंडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अहमदनगर शहरातही महापालिका प्रशासनामार्फत 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर तर नागरिकांना स्वतःच्या घरावर स्वयंस्फुर्तीने ध्वज संहितेचे पालन करून राष्ट्रध्वज उभारावेत, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी 75 हजार 960 इमारतींचे उद्दीष्ट निश्चीत करण्यात आल्याचे आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com